Maval News: अखिल भारतीय वारकरी संघाच्या मावळ तालुकाध्यक्षपदी अनंता लायगुडे

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय वारकरी संघाच्या मावळ तालुकाध्यक्षपदी अनंता लायगुडे यांची कार्याध्यक्षपदी संजय बांदल यांची निवड करण्यात आली आहे. 

अखिल वारकरी संघ मावळ तालुक्याचे वतीने कान्हे येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय प्रवक्ते उमेश महाराज शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र महाराज धानेपकर, सचिव संजय महाराज हिवराळे, संघटक पांडुरंग महाराज  शितोळे, उपाध्यक्ष गोविंद महाराज  गोरे, राष्ट्रीय सदस्य सतिष अण्णा वाल्हेकर, खजिनदार प्रविण लोळे, प्रचार प्रमुख लक्ष्मण महाराज पाटिल,पुणे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र महाराज शास्त्री, राष्ट्रीय कोषाध्यक्ष यशवंत महाराज फाले, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष एकनाथ सांगोलकर, पश्चिम महाराष्ट्र कोषाध्यक्ष अक्षय येवले, श्रीकांत धुमाळ या सर्व राष्ट्रीय पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.

या मध्ये खालिल पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

मावळ तालुका अध्यक्ष – अनंता  लायगुडे

आंदर मावळ अध्यक्ष – नंदकुमार शेटे

उपाध्यक्ष  – मकरंद  ढम

उपाध्यक्ष –  धोंडिभाऊ घोजगे

कार्याध्यक्ष –  संजय  बांदल

सचिव –  प्रभू  टेमगिरे

तालुका संपर्क प्रमुख – शरद  घोट्कुले

खजिनदार –  गणेश  वाळंजकर

तालुका संघटक –  नितीन  मस्के

तालुका संघटक –  योगेश  चोपडे

सह साचिव –  चंद्रकांत  सोरटे

प्रसिद्धी प्रमुख –  विकास वाजे

उर्वरित पदांच्या निवडी लवकरच करण्यात येतील. यामध्ये मावळ तालुका कार्यकारीणी, विभागीय कार्यकारिणी, नाणे मावळ, आंदर मावळ विभागीय कार्यकारिणी यांचा समावेश असेल. ज्यांची कार्यकारिणीवर काम करण्याची ईच्छा असेल त्यांनी संबंधितांशी संपर्क करावा. असे आवाहन मावळ तालुका अखिल वारकरी संघाच्या वतीने करण्यात आले आहे.अशी माहीती पश्चिम महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष अक्षय येवले यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.