Maval News : मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप – काँग्रेसची हातमिळवणी

एमपीसी न्यूज – मावळ तालुका (Maval News) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडून काँग्रेसने भाजपा प्रणित सर्वपक्षीय पॅनेलमध्ये उमेदवार उभे करून राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिल्याचे पाहयला मिळत आहे. काँग्रेसने भाजपाशी हातमिळवणी केल्याने तो संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय झाला आहे.

मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत 18 जागांसाठी 40 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून भाजपा, काँग्रेस, शिवसेना,आरपीआय छत्रपती शिवाजी महाराज सर्व पक्षिय सहकार परिवर्तन पॅनेल व राष्ट्रवादी, एसआरपी महाविकास आघाडीचे सहकार पॅनेल यांच्यात सरळ लढत होत असून चार जण अपक्ष आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज सर्व पक्षीय सहकार परिवर्तन पॅनलचे उमेदवार-

सर्वसाधारण कृषि पतसंस्था शत्रुघ्न रामभाऊ धनवे, निलेश विष्णू मराठे, बंडू तुकाराम कदम,सुभाष रामभाऊ देशमुख,विशाल बबनराव भांगरे, प्रसाद प्रकाश हुलावळे, खंडू बाळाजी तिकोने, कृषि पतसंस्था महिला नंदा देवराम सातकर,कांचन सुभाष धामणकर, कृषि पतसंस्था ओबीसी एकनाथ नामदेव पोटफोडे, कृषि पतसंस्था भटक्या विमुक्त जमाती शरद परशुराम साळुंखे,ग्रामपंचायत सर्वसाधारण योगेश गजानन राक्षे, शिवराम मारुती शिंदे, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल अस्लम जमिल शेख, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती अंकुश ज्ञानदेव सोनवणे, व्यापारी सर्वसाधारण प्रकाश रामचंद्र देशमुख, नामदेव ज्ञानेश्वर कोंडे, हमाल तोलारी सर्वसाधारण हनुमंत ईश्वर मराठे.

महाविकास आघाडी सहकार पॅनेल – Maval News

सर्वसाधारण कृषि पतसंस्था दिलीप नामदेव ढोरे, संभाजी आनंदराव शिंदे, सुभाष रघुनाथ जाधव,विलास सदाशिव मालपोटे, बंडू दामू घोजगे, मारुती नाथा वाळुंज,साईनाथ दत्तात्रय मांडेकर, कृषि पतसंस्था महिला सुप्रिया अनिल मालपोटे,अंजली गोरख जांभुळकर, कृषि पतसंस्था ओबीसी शिवाजी चिंधु असवले, भटक्या विमुक्त जमाती विलास बबन पवार.

ग्रामपंचायत सर्वसाधारण –

नामदेव नानाभाऊ शेलार, विक्रम प्रकाश कलवडे, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल अमोल अरुण मोकाशी, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती नथु शंकर वाघमारे, व्यापारी सर्वसाधारण भरत दशरथ टकले,महेंद्र छगनलाल ओसवाल, हमाल तोलारी सर्वसाधारण शंकर अंतू वाजे. अपक्ष जितेंद्र परदेशी, नवनाथ हरपुडे, परशुराम मालपोटे, सुनील दाभाडे आदी

निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक शिवाजी घुले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्रकुमार नेहुल, जितेंद्र विटकर, गंगाधर कोतावार,राकेश निखारे आदीं निवडणूक कामकाज पाहत आहे.

Alandi : आळंदीमध्ये श्री शुक्ल यजुर्वेद घनपारायण शोभायात्रा

आज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस असल्याने 76 नामनिर्देशन पत्र मागे घेण्यात आले.शुक्रवारी चिन्ह वाटप करण्यात येणार आहेत. ही निवडणूक चुरशीची होणार असुन दोन्ही पॅनेल आमचाच विजय होणार असल्याचे सांगत आहेत. त्यातच पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद व महानगरपालिका निवडणुका नसल्याने कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

काँग्रेस पक्षाचे दोन गट झाले एक गट भाजपात सामील झाला आहे, तर दुसरा गट महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलमध्ये सामील झाला आहे. परंतु, महाविकास आघाडीत काँग्रेसचे उमेदवार आमचे नसुन आम्ही छत्रपती शिवाजी महाराज सर्व पक्षीय सहकार परिवर्तन पॅनलमध्ये उमेदवार उभे केले असल्याचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.