Alandi : आळंदीमध्ये श्री शुक्ल यजुर्वेद घनपारायण शोभायात्रा

एमपीसी न्यूज : मोशी येथील प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज (Alandi) यांचे सानिध्या असलेले वेद श्री तपोवन येथे एक महिना श्री शुक्ल यजुर्वेद घनपारायणाचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता आळंदी येथे महर्षी वेद व्यास प्रतिष्ठान पाठशाळा येथे झाली.

आज पारायणकर्ते वे.मू.शिशिर दिगम्बर मुळी, वे.मू.ऋषिकेश रामेश्वर व्यास यांना हत्तीवर विराजमान करत श्री यजुर्वेद घन पारायण शोभायात्रा श्री नृसिंह मठापासून, नगरप्रदक्षिणा मार्ग श्री सद्गुरू निजानंद महाराज वेदविद्यालयपर्यंत
काढण्यात आली.

Lonavala : लोणावळ्यात आयपीएल मॅचवर बेटिंग घेणार्‍यांवर पोलिसांचा छापा; पाच जणांवर गुन्हा दाखल

ही शोभा यात्रा ढोल ताश्याच्या वाद्यात, उंट,घोडे व आकर्षक विद्युत रथासह फटाक्याच्या आतिषबाजीत काढण्यात आली. यावेळी स्मार्तचुडामणि (Alandi) वेदमूर्ती शांताराम भानोसे गुरुजी, वेदभास्कर वेदमूर्ती प्रशांत जोशी गुरुजी या सन्मानीय परिक्षकांसह अनेक मान्यवर होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.