Lonavala : लोणावळ्यात आयपीएल मॅचवर बेटिंग घेणार्‍यांवर पोलिसांचा छापा; पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : आयपीएल मॅचवर सट्टा घेणार्‍या पाच जणांवर (Lonavala) लोणावळ्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून एक लॅपटाॅप, काही मोबाईल संच व टिव्ही असा साधारणतः 1 लाख 57 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) लोणावळ्यातील एका बंगल्यात ही कारवाई केली.

याप्रकरणी पुणे ग्रामीण एलसीबीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून राजविनसिंग मनजितसिंग बांगा (वय 27, क्लब व्यवसाय, रा. वडाळा ट्रक टर्मिनल, मुंबई), मस्कीनसिंग रजेद्रसिंग अरोरा (वय 30, क्लब व्यवसाय रा पंजाबी काॅलनी, सायन कोळीवाडा), शषांक महाराणा (रा. प्रतिक्षानगर सायन ईस्ट), ईफ्तेकार ऊर्फ इमरान खान (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही), षेन्टी (पुर्ण नाव माहित नाही) रा. सायन ईस्ट कोळीवाडा यांच्यावर भादवं कलम 420, 465, महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4(अ),भारतीय टेलिग्राफ अँक्ट कलम 25(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजस्थान राॅयल विरुद्ध लखनऊ जाएंट या सवाई मानसिंग स्टेडियम जयपुर येथे सुरु असलेल्या आयपीएल टी – 20 सामन्यावर काही जण एका खाजगी बंगल्यात बसून बेटिंग घेत असल्याची गुप्त माहिती पुणे ग्रामीणच्या एलसीबी पथकाला मिळाल्यानंतर या पथकाने तुंगार्ली भागातील सदर बंगल्याजवळ सापळा लावत बुधवारी रात्री (Lonavala) छापा मारला असता.

आत बंगल्यामध्ये वरील सर्वजण वेगवेगळ्या नावाने घेतलेल्या विविध मोबाईो सिमच्या माध्यमातून काही अँप्लिकेशनचा वापर करत लॅपटाॅपवर बेटिंग घेत असताना मिळून आले. शासनाकडून बेटिंगवर बंदी असताना देखील फसवणूक करत ही बेटिंग सुरु असल्याचे दिसून आल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, अप्पर अधीक्षक व एलसीबी पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी हे पुढील तपास करत आहेत.

Kharghar : महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यातील दुर्दैवी घटनेची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करा – अजित पवार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.