Maval News : कोकण पूरग्रस्तांसाठी मावळ शिवसेनेकडून मदतीचा हात

एमपीसीन्यूज : कोकणातील पूरग्रस्तांसाठी मावळ तालुका शिवसेनेच्या मदतीचा हात देण्यात आला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जीवनावश्यक साहित्य, कपडे आणि बिस्कीट व पाणी बॉटलचे बॉक्स  मावळ तहसील कार्यालयाकडे सुपूर्द केले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांच्या हस्ते मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, पंचायत समिती गटविकास अधिकारी सुधीर भागवत, महिला बालकल्याण अधिकरी विशाल कोतागडे यांच्याकडे यांच्याकडे आज, गुरुवारी ही मदत देण्यात आली.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, युवासेनेचे जिल्हा समन्वयक अनिकेत घुले, महिला आघाडी मावळ संघटिका अनिता गोंते, वडगाव शहर शिवसेनेचे राहुल नखाते, डॉ. विकेश मुथा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनाथ हारपुडे, उपविभागप्रमुख विलास अडिवळे, उपशहरप्रमुख सुदेश लाड, अनिल ओव्हाळ संतोष ढोरे, प्रशांत रवणे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.