Pimpri News : मनसेचा कोकण पुरग्रस्तांना एक हात मदतीचा

एमपीसी न्यूज – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हाकेला साद देत  पिंपरी-चिंचवड शहर मनसेच्या वतीने कोकण पुरग्रस्तांना मदत करण्यात आली. प्रामुख्याने पुरग्रस्तांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तु भांडी, अंन्नधान्य, साड्या, औषधे, गुडनाईट/मॉर्टिन कॉइल, बिस्किटे, बिसलेरी पाणी, फिनेल, साबन याचा समावेश होता.

मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वात खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी मधील खेड तालुक्यातील कुंभार वाडा आणि ब्राम्हण आळी तसेच चिपळूण तालुक्यातील चारगाव खांदाट, भोईवाडी,दळवटणे बागवाडी, इंगवलेवाडी,खेर्डी एम. आय. डि. सी. मफतलाल चाळ, खेर्डी मोहल्ला, खेर्डी सुर्वे चाळ या ठिकाणी वाटप करण्यात आले व पुरग्रस्त विविध भागातील पाहणी केली.

त्या प्रसंगी राजू सावळे, विशाल मानकरी, दत्ता देवतरासे, सुशांत साळवी, सचिन मिरपगार, तेजस दाते, सुरज जाधव, नितिन शिंदे, अविनाश तरडे, स्वप्निल महांगरे, प्रवीण माळी, निलेश ननावरे, भरत क्षेत्रे, आकाश जाधव, नारायण पठारे, निलेश पवार, रोहिदास शिवनेकर, मंगेश भालेकर, सतीष सामनगावे, समाधान केंद्रे, अविनाश एकंबे, श्रावण गोयल, श्रद्धा देशमुख, सोनाली गावडे, अभिषेक गावडे, सुभाष पाटिल, विपुल काळभोर, ओंकार काळभोर, रोहित भोकरे, जय सकट, प्रदीप घोड़के , प्रविण सोलंकी हे सर्व मदत करण्यासाठी उपस्थित होते.

ही सर्व मदत 10 टन होती. ती मदत प्रभागातुन, शहरातुन, व सर्व मनसैनिकांनी दिली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.