Pune News : पुण्यात पुन्हा एकदा गोळीबार, 27 वर्षीय तरुण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज : मागील काही दिवसांपासून पुण्यात बंदुकीचा धाक दाखवून लुटमारीच्या आणि छोट्या वादातही बंदुकीचा वापर करण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. पुण्यातील शिवणे परिसरातही रविवारी रात्री असाच प्रकार उघडकीस आला असून एका टोळक्याने कारमधून निघालेल्या तरुणावर गोळीबार केला आहे. यामध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने पुन्हा शहरात खळबळ उडाली आहे.

केदार भालशंकर (वय -27, रा. रामनगर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. उत्तमनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केदार हे त्यांच्या कारमधून जात होते. त्यावेळी शिवणे येथे आल्यानंतर दुचाकीवर आलेल्या टोळक्याने त्यांच्यावर गोळीबार केला आहे. हा गोळीबार पूर्ववैमनस्यातून झाला असण्याची शक्यता आहे. यात एक आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीसाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान यात केदार हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या पाठीत गोळी लागली आहे. शहर गोळीबाराच्या घटनांनी मात्र सतत धडगधगत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.