Baramati News : स्वतःच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याकडे लाच मागणाऱ्या उपअभियंत्यावर गुन्हा दाखल

एमईपीसी न्यूज : स्वतःच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याचे मेडिकल बिल मंजूर करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाज मागणी करणाऱ्या सिंचन विभागातील उप अभियंता आणि एका खासगी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बारामती तालुक्यात ही कारवाई केली आहे. 

संजय नारायण मेटे आणि पोपट दशरथ शिंदे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, संजय नारायण मेटे हे बारामती तालुक्यातील पळसदेव येथील भीमा उपसा सिंचन विभागात उप अभियंता म्हणून कार्यरत आहे. तर या प्रकरणातील तक्रारदार हे देखील याच कार्यालयात काम करतात. तक्रारदार यांचे मेडिकल बिल मंजुरीसाठी पाठवण्यासाठी संजय मेटे यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. इतर खाजगी इसम असलेल्या पोपट शिंदे यांनी त्यांना प्रोत्साहन दिले होते.

दरम्यान लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली होती. विभागाने या तक्रारीची पडताळणी केली असता संजय मिळते आणि पोपट शिंदे यांनी लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या दोघांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.