India Corona Update : गेल्या 24 तासांत 35,499 नवे कोरोना रुग्ण, 39,686 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – भारतात गेल्या 24 तासांत 34 हजार 499 नव्या रुग्णांची वाढ झाली असून, गेल्या 24 तासांत 39 हजार 686 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 19 लाख 69 हजार 954 एवढी झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 3 कोटी 11 लाख 39 हजार 457 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्या 4 लाख 02 हजार 188 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

भारतात आजवर 4 लाख 28 हजार 309 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 447 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.34 टक्के एवढा आहे तर, रिकव्हरी रेट 97.40 टक्के एवढा आहे.

देशात आजवर 48 कोटी 17 लाख 67 हजार 232 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 13 लाख 71 हजार 871 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत 50 कोटी 68 लाख 10 हजार 492 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.