Maval News : मावळ तालुक्यातील प्राथमिक शाळांमध्ये अपुरे शिक्षक

एमपीसी न्युज : मावळ तालुका हा शहरी आणि ग्रामीण भागात विखुरला आहे. तालुक्यात 274 प्राथमिक शाळा आहेत. यातील अनेक शाळांमध्ये अपुरे शिक्षक आहेत.(Maval News) पुरेसे शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी झाल्याचे उघडकीस आले असून तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना पुरेसे शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. याबाबतची मागणी मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून करण्यात आली आहे. मागणीचे पत्र मावळ पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांना देण्यात आले आहे.

यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष किशोर सातकर,आशिष ढोरे, सोमनाथ वाघोले, सचिन मु-हे, रणजीत हिंगे,भानुदास जांभुळकर,चेतन थोरवे,जितेंद्र पानसरे,साजिद इनामदार,अजित चौधरी,नितीन मु-हे,शाम पवार आदीजण उपस्थित होते.

Chinchwad student felicitation: चिंचवड येथे विद्यार्थी व यशस्वी व्यक्तींचा गुणगौरव  

दिलेल्या मागणीपत्रात म्हटले आहे की, मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकुण 274 प्राथमिक शाळा आहे. या मध्ये जवळपास 17,500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या प्राथमिक शाळांमध्ये 851 इतके शिक्षक ज्ञानदानाचे काम करीत आहे. मावळ तालुका शहरी आणि ग्रामीण भागात विखुरला आहे.(Maval News) तळेगाव व लोणावळा नगरपरिषद वगळता,आंदर मावळ, नाणे मावळ व पवन मावळासह कामशेत, इंदोरी, टाकवे बुद्रुक, पवनानगर या मोठ्या गावातील प्राथमिक शाळेत शिक्षकांची अपुरी संख्या असल्याचे आपल्या निदर्शनास आणून देत आहोत.

 

तसे पाहिले तर भौगोलिक दृष्ट्या गाववाडयात विखुरलेल्या दुर्गम भागात शिक्षक जाण्या येण्यासाठी वेळ जात असल्याची वस्तुस्थिती नाकारता येत नाही.(Maval News) त्यात मावळ तालुक्यात पावसाचे प्रमाणही अधिक आहे. त्याचाही परिणाम विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत असल्याचेही मागणीपत्रात म्हटले आहे.

 

पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल पाहिला तरी विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता घटली आहे असे दिसून येत असल्याचे म्हटले आहे. (Maval News) त्यामुळे मावळ तालुक्याला पुरेशा प्रमाणात शिक्षक उपलब्ध करून देऊन, विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्याची विनंती करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.