Maval News : आंदरमावळतील निगडे ते शिरे रस्त्याच्या डांबरीकरणास सुरुवात

एमपीसी न्यूज – आंदर मावळातील निगडे ते शिरे गावच्या दरम्यान कच्चा रस्ता असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांची या रस्त्यावरून प्रवास करताना गैरसोय होत होती.यासाठी निगडे ते शिरे या साडेचार किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी आमदार सुनिल शेळके यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 3 कोटी 15 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.

आंदरमावळातील दुर्गम भागातील असलेल्या शिरे गावात जाण्यासाठी पूर्वी छोटा व कच्चा रस्ता रस्ता होता. या रस्त्यावरून मोठी वाहने जाण्यास अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आमदार सुनिल शेळके यांनी सुमारे 3 कोटी 15 लाख 84 हजार रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. या निधीतून निगडे ते शिरे या साडेचार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार असून या रस्त्यावर 3.75 मीटर रुंदीचे डांबरीकरण व रस्त्याच्या दुतर्फा 1.75 मीटरच्या साईटपट्टया असे एकूण 7.5 मीटर रुंदीचा हा रस्ता बनविण्यात येणार आहे.

या रस्त्याच्या कामास मंगळवारी (दि.25) सुरुवात करण्यात आली असून या रस्त्याच्या कामाचे भूमिपुजन निगडे गावच्या सरपंच सविता भांगरे, आंबळे गावचे सरपंच मोहन घोलप, उपसरपंच सुरेखा नखाते, पोलीस पाटील संतोष भागवत, माजी सरपंच सोपान ठाकर, मंगल मोढवे, रवी पवार, नवनाथ मोढवे,रामदास शेटे, कैलास मोढवे, रोहिदास भांगरे, दिगंबर आगिवले, रघुनाथ मोढवे, नथू पवार, धोंडीबा भागवत, हनुमंत हांडे यांच्या उपस्थितीत पार पडले.

मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याचे काम होत असल्याने नागरिकांनी आमदार शेळके यांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.