Pimpri News : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्यावतीने नृसिंह जयंती साजरी

एमपीसी न्यूज -अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि ब्रह्मचैतन्य परिमंडळ यांच्या वतीने भगवान नृसिंह जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त भगवान परशूराम, महात्मा बसवेश्वर, भगवान गौतम बुद्ध आणि स्वातंत्र्यवीर वि.दा सावरकर यांचाही जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शासकीय नियमांचे पालन करत हा कार्यक्रम पार पडला.

माजी सैनिक भगवान जोशी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला, ब्रह्मचैतन्य क्रेडिट सोसायटीचे चेअरमन शंकरराव कुलकर्णी यांनी परशुरामाच्या प्रतिमेला, लिंगायत समाज कार्यकर्ते मल्लीनाथ थोंटे यांनी बसवेश्वर प्रतिमेला आणि महासंघाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप कुलकर्णी यांनी गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केली. पूजाविधी आणि आरती करून प्रसाद वाटप करण्यात आले.

कार्यक्रमासाठी दिपक कुलकर्णी, पुजा कुलकर्णी, दिपाली कुलकर्णी, लक्ष्मणप्रसाद तिवारी, मीना तिवारी, सुनंदा कुलकर्णी, श्रेयस पाठक, दिनेश कुलकर्णी, बी. बी. कुलकर्णी, सीताबाई कुलकर्णी यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.