-MPC-TOP-MOST-BANNER-I

Maval News: पवना धरण परिसरात पावसाचा जोर ओसरला; धरण 90.38 टक्के भरले

1 जूनपासून आजपर्यंत 1 हजार 408 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर याच काळात पवना धरणातील पाणीसाठा 55.09 टक्के वाढला आहे.

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. पवना धरणातील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. मागील 24 तासांत धरण क्षेत्रात 8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरणात 1.09 टक्के पाणीसाठा वाढला आहे. यामुळे सध्या पवना धरण 90.38 टक्के भरले आहे.

31 जुलैपर्यंत धरणात 33.60 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे मावळातील शेतकरी आणि पिंपरी-चिंचवडकर यांच्यामध्ये काहीसे चिंतेचे वातावरण होते. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने चांगला जोर धरला आणि शेतकरी व शहरवासीय यांच्या आशा पल्लवित झाल्या.

1 जूनपासून आजपर्यंत 1 हजार 408 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर याच काळात पवना धरणातील पाणीसाठा 55.09 टक्के वाढला आहे.

गेल्या 24 तासांत 8 मिलिमीटर पाऊस पडला आहे. डोंगराळ भागातून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात धरणात येत आहे. त्यामुळे मागील 24 तासांत पवना धरणाच्या पाणीसाठ्यात 1.09 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आज धरणात 90.38 टक्के पाणीसाठा 

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारा पवना धरण हा एकमेव स्रोत आहे. पवना धरण पूर्ण भरण्याकडे वाटचाल करत आहे. धरण पूर्ण भरले तरीही शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाआड असाच राहण्याची शक्यता आहे. शहराला पाणीपुरवठा करणारा दुसरा स्रोत सुरू होईपर्यंत ही स्थिती राहिल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn