Maval : वडगावमावळला सीएम चषक इंद्रधनुष्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथे सीएम चषक स्पर्धा 2018 आयोजित इंद्रधनुष्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा तीन गटात होणार आहे.

श्री पोटोबा महाराज मंदिर याठिकाणी रविवारी दि. 9 डिसेंबरला सकाळी आठ वाजता ही स्पर्धा होईल. स्पर्धेमध्ये प्रथम गट – इयत्ता पहिली ते चौथी, द्वितीय गट – इयत्ता पाचवी ते सातवी, तृतीय गट इयत्ता आठवी ते सर्वांसाठी असे असून चित्रकला स्पर्धेकरिता प्रथम गटासाठी निसर्ग चित्र, माझा आवडता खेळ, माझा आवडता प्राणी/ पक्षी, द्वितीय गटासाठी शेतकरी जीवन, स्वच्छता अभियान, भारतीय सन तर तृतीय गटासाठी एतिहासिक प्रसंग (शिवकालीन), बाजार, राजकीय व्यक्तीमहत्वाचे चित्र या विषयावर चित्र काढायची आहे. कार्यक्रमाचे आयोजन रमेश ढोरे, शेखर वहिले, किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, दिनेश ढोरे, अमोल ढोंबरे, प्रमोद नवघणे, सागर भिलारे, राजेंद्र म्हाळसकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.