HB_TOPHP_A_

Talegaon : तळेगावला सीएम चषक इंद्रधनुष्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन

232

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथे सीएम चषक स्पर्धा 2018 आयोजित इंद्रधनुष्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा तीन गटात होणार आहे.

HB_POST_INPOST_R_A

थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळा याठिकाणी रविवारी दि. 9 डिसेंबरला सकाळी साडे सात वाजता ही स्पर्धा होईल. स्पर्धेमध्ये प्रथम गट – इयत्ता पहिली ते चौथी, द्वितीय गट – इयत्ता पाचवी ते सातवी, तृतीय गट इयत्ता आठवी ते सर्वांसाठी असे असून चित्रकला स्पर्धेकरिता प्रथम गटासाठी निसर्ग चित्र, माझा आवडता खेळ, माझा आवडता प्राणी/ पक्षी, द्वितीय गटासाठी शेतकरी जीवन, स्वच्छता अभियान, भारतीय सन तर तृतीय गटासाठी एतिहासिक प्रसंग (शिवकालीन), बाजार, राजकीय व्यक्तीमहत्वाचे चित्र या विषयावर चित्र काढायची आहे. कार्यक्रमाचे आयोजन संदीप काकडे, रवींद्र माने, विनायक भेगडे, प्रवीण गटे, गोरख काकडे यांनी केले आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: