Maval : पवना धरण 45 टक्के भरले; गतवर्षीच्या तुलनेत 30.63 टक्क्यांनी कमी पाणीसाठा

एमपीसी न्यूज – पवना धरणात 44.53 टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत 30.63 टक्क्यांनी हा पाणीसाठा कमी आहे. धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरणात 44.53 टक्के पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात 31 मिली मीटर पाऊस झाला असून 1.09 टक्क्यांनी पाणी साठ्यात वाढ झाली आहे. 1 जूनपासून पाणलोट क्षेत्रात 1118 मिली मीटर पावसाची नोंद झाली असून पाणीसाठ्यात 30.07 टक्के वाढ झाली आहे.

गतवर्षी आजमितीला धरणात 75.17 टक्के पाणीसाठा होता. गतवर्षी आजच्या तारखेपर्यंत 1779 मिली मीटर पावसाची नोंद झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पवना धरणात 30.63 टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे. दरम्यान, 44.53 टक्के हा पाणीसाठा केवळ चार महिनेच पुरेल एवढा आहे. त्यामुळे तुर्तास पाणीकपात रद्द केली जाणार नाही. आणखीन काही दिवस एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु ठेवला जाणार आहे. पावसाचा अंदाज घेऊनच पाणीकपात रद्द करणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.