Maval : नेसावे गावात श्वानांच्या हल्ल्यात सांबर जखमी

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील नेसावे गावात श्वानांच्या हल्ल्यात ( Maval) एक सांबर जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि. 27) दुपारी घडली. त्यानंतर वनविभागाने वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या मदतीने सांबराला पुणे येथील रेस्क्यू सेंटर मध्ये पाठवले.

 

नेसावे गावात श्वानांच्या हल्ल्यात एक सांबर जखमी झाल्याची माहिती किरण शिरसाट यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे आणि सदस्य चंद्रकांत बोंबले यांना दिली. गराडे यांनी ही माहिती वनविभागाला कळविली. शिरोता वनपरिक्षेत्राचे वनरक्षक चव्हाण आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य चंद्रकांत बोंबले, जिगर सोलंकी यांनी नेसावे गावात धाव घेतली.

 

Maharashtra NCC : महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम; ‘प्रधानमंत्री बॅनर’ विजेत्याचा बहुमान

 

श्र्वानांच्या हल्ल्यात सांबर जखमी झाले होते. त्यास पुढील उपचारासाठी पुणे येथील रेस्क्यू सेंटर मध्ये दाखल करणे आवश्यक होते. त्यानुसार शिरोता वनपरिक्षेत्राचे अधिकारी सुशील मंतावर यांच्या मार्गदर्शनाखाली सांबराला वनविभागाच्या वाहनातून रेस्क्यू सेंटर मध्ये पाठवण्यात आले.

 

विशाल शिरसट, अनिल शिरसट, रामदास शिरसट, भरत शिरसट, दत्ता शिरसट, गुलाब शिरसट, सूरज शिरसट, सागर शिरसट या ग्रामस्थांनी या कामात मदत केली. आपल्या परिसरात कोणताही वन्य प्राणी जखमी अवस्थेत आढळल्यास वनविभागाला (1926) अथवा वन्यजीव रक्षक मावळ संस्थेला (9822555004) माहिती द्यावी असे आवाहन ( Maval) निलेश गराडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.