BNR-HDR-TOP-Mobile

Maval : सुनील शेळके यांच्या गाव दौऱ्यात तरुण अन् लहानग्यांचे प्रेम आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद!

एमपीसी न्यूज – लहानग्यांचे आणि तरुणांचे प्रेम तर ज्येष्ठांच्या आशीर्वादाच्या पावसात भाजपचे युवानेते व तळेगाव दाभाडेचे माजी नगराध्यक्ष सुनील शेळके यांच्या गाव भेट दौऱ्याचा दुसरा दिवस आज लक्षवेधी ठरला. फटाके वाजवून मिरवणुका काढून पवन मावळातील गावांमध्ये शेळके यांचे आजही उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

मावळ विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असलेल्या शेळके यांच्या गाव भेटीच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या दिवसाची सुरूवात ब्राह्मणोली गावातून ओंकारेश्वर गणपतीच्या दर्शनाने झाली. शेळके यांनी आज आज ब्राह्मणोली, ठाकूरसाई, तिकोणा पेठ, गेव्हंडे वसाहत, जवण नं. 1, 2,3, आजिवली, वाघेश्वर-कादव, शिळीम, बोडशेळ, चावसर-केवरे, मोरवे, तुंग, कोळे चाफेसर या गावांमधील ग्रामस्थांच्या भेटी-गाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. शेळके यांच्या आजच्या दौऱ्यात बबन वरवे, भीमराव मोहोळ, भारत काळे, अनिल तुपे, मधुकर काळे, बाळू राऊत, अनंता लायगुडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

प्रत्येक गावात तरुणवर्गाकडून शेळके यांचे उत्स्फूर्त स्वागत होताना पहायला मिळत होते. तरुणांमध्ये शेळके यांच्याविषयी प्रचंड प्रेम असल्याचे प्रत्येक गावात त्यांच्या भोवती तरुणांचा गराडा पडत होता. शेळके यांच्याबरोबर ‘सेल्फी’ घ्यायलाही तरुण कार्यकर्त्यांची झुंबड उडत होती. गावातील लहान मुलांमध्ये सुनीलअण्णांविषयी विशेष आकर्षण दिसून आले. सुनीलअण्णा यांनी देखील ठिकठिकाणी लहानमुलांना उचलून घेत त्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला. शेळके यांच्या या लहान मुलांवरील प्रेमाचे गावोगाव कौतुक झाले.

प्रत्येक गावात ग्रामदैवतांची मंदिरे व अन्य मंदिरांना भेट देऊन शेळके यांनी दर्शन घेतले. गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच प्रमुख मंडळींना समक्ष भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. गावासाठी यापूर्वी शेळके यांनी केलेल्या विविध कामांचा ग्रामस्थांनी आवर्जून उल्लेख केला. गावाला भेडसावत असलेल्या प्रश्नांची माहिती ग्रामस्थांनी यावेळी शेळके यांना दिली. मावळातील प्रत्येक गावाशी यापुढेही अशाच प्रत्येक संपर्कात राहून सर्व प्रश्न शासन आणि नागरिकांच्या सहकार्याने सोडविण्यासाठी आपण सदैव कटबद्ध राहू, अशी ग्वाही शेळके यांनी यावेळी दिली.

.