Maval : वडार समाजाचा खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा

एमपीसी न्यूज – वडार समाजाच्या प्रलंबित मागण्या शिवसेना भाजप सरकार पूर्ण करेल. असा विश्वास असल्याने मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघात संपूर्ण वडार समाज युतीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देत आहे, असे पत्रक ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संस्थेचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष मोहिते, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुनील शिंदे यांनी प्रसिद्धीस दिले आहे. याबाबत पाठिंब्याचे पत्र मावळ लोकसभेतील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे याना देण्यात आले.

यावेळी भाजपा शहर सरचिटणीस संजय मंगोडेकर, पुणे जिल्हा वडार समाज अध्यक्ष हिरामण पवार, पिंपरी चिंचवड सरचिटणीस संजय पवार, उपाध्यक्ष शाम पवार, ज्येष्ठ नेते विठ्ठल मोरे, नारायण धोत्रे, लक्ष्मण शिंगाडे, युवराज बनपट्टे, श्रीकांत शिंगाडे, नामदेव मुदगल, अजय शिंगाडे, अभिराज शिंदे, अमित बनपट्टे, साहिल पवार, लखन पाटकर, अमर दौंडकर, अविनाश वेताळ, अमोल कुसाळकर, चंद्रकांत पवार, नवनाथ कुसाळकर, मारुती पवार, गंगाराम लष्करे उपस्थित होते.

या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, निती आयोगाच्या शिफारशीनुसार वडार समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात करावा. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वडार समाजाच्या मजूर सहकारी संस्थांना 10 टक्के कामे विनास्पर्धा देण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे. त्याची कटाक्षाने अंमलबजावणी व्हावी अशी मागणी

ज्या ठिकाणी वडार बांधव शासकीय जमिनीवर, पडीक व मुलकी जमिनीवर राहत आहेत त्यांना कायमस्वरूपी त्या जागेची प्रॉपर्टी कार्ड देण्यात येतील. घरबांधणीसाठी पंतप्रधान आवास योजनेतून 2.5 लाखांचे अनुदान तसेच कामगार कल्याण महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून 2 लाख रुपयांचे अनुदान असे एकूण साडेचार लाख रुपयांचे अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर येथे जाहीर केले होते.

युती सरकारच्या माध्यमातून वसंतराव नाईक महामंडळांतर्गत वडार समाजासाठी उपमहामंडळ निर्माण करून 100 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज देण्यात आले आहे. या उपमहामंडळावर वडार समाजाचे नेते विजय चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच या महामंडळाला राज्य मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला. या निधीपैकी 50 कोटी रुपयांचा निधी वडार समाजाच्या युवकांना उद्योग, व्यवसाय व स्वयंरोजगारासाठी वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वडार समाजाच्या मुलांसाठी केजी टू पीजी शिक्षणाची सुविधा राज्यभर विभागस्तरावर सरकारने उपलब्ध करून द्यावी. अशा विविध मागण्या वेळोवेळी माननीय मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या होत्या. याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत.

स्वातंत्र्य काळापासून महाराष्ट्रामध्ये वडार समाजाच्या न्याय्य हक्क व मागण्यांकडे शासनस्तरावर नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेऊन ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले यांना वडार समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी नेमण्यात आलेल्या समन्वय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. हे सरकार समाजाच्या प्रलंबित मागण्याही मान्य करेल. असा विश्वास असल्याने विजय चौगुले यांच्या आदेशाने मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघात संपूर्ण वडार समाज युतीच्या उमेदवारांना जाहिर पाठिंबा देत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.