Pimpri : राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे लोणावळा लोकलमध्ये पार्थ पवार यांचा प्रचार

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष व मित्र पक्षाचे आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज दापोडी ते लोणावळा लोकलमध्ये प्रवाशांशी संवाद साधून पार्थ पवार यांना निवडून देण्यासाठी आवाहन केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली लोकलमध्ये प्रचार यंत्रणा राबवण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांनी प्रवाशांच्या समस्या समजून घेत राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभेच्या व्हिजनबाबत चर्चा केली.
यावेळी प्रदेश संघटक विशाल काळभोर, युवक प्रवक्ते भागवत जवळकर, शहर युवक उपाध्यक्ष निखिल दळवी, संघटक शादाब खान, सरचिटणीस प्रतीक साळुंखे, सरचिटणीस तुषार सोनवणे, सरचिटणीस किरण काकडे, रमनदीप सिंग कोली, सचिव ऋषिकेश सोनवणे, अमोल खंडागळे, संदीप दरेकर, तानाजी काळे, कुणाल देशमुख यांच्यासह अनेक पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या वेळेस सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.