Mavala Corona Update : तालुक्यात बुधवारी 11 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्या कमी जास्त होत आहे. तालुक्यात बुधवारी (दि.2) 11 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात 04 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रूग्णांची संख्या 55 आहे.

वडगाव नगरपंचायत 1, तळेगाव दाभाडे नगरपरिषद 2 व लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत आज 5 रूग्ण सापडले. सध्या रुग्णालयात 55 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 7693 झाली आहे. तर दिवसभरात 04 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 8 रुग्ण तर ग्रामीण भागात वराळे, इंदोरी व गहुंजे या ठिकाणी प्रत्येकी एक रूग्ण सापडला.

ग्रामीण भागात 3 रूग्ण सापडले तर शहरी भागात वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 1, तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत 02 रूग्ण व लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 5 रूग्ण असे मिळून 11रूग्ण सापडले. 55 रुग्ण सक्रिय आहेत. 7417 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मावळ तालुक्यातील आज कोरोना रूग्णाचा एकही मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 221 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2253, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1545 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 524 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 4322 रुग्ण तर ग्रामीण भागात 3371 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.