Maval News : पावसात नुकसान झालेल्या तुंग येथील निराधार महिलेला बजरंग दलाकडून शिधा वाटप

एमपीसीन्यूज : मावळात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मावळ तालुक्यात अनेक वाड्या वस्त्यांवर पूरस्थिति निर्माण झाली. अनेकांचे शेती वाहून गेली, शेताचे बांध फुटले, अनेकांच्या घरात पाणी शिरल, अनेकांचे संसार डळमळीत झाले. नद्यांना पुर आले. अशा संकट काळात बजरंग दलाने तुंग येथील निराधार महिलेला शिधा वाटप केला. तसेच पावसात त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. त्यांना पुन्हा घर बांधून देण्यासाठी दानशूर व्यक्तींनी मदत करावी, असे आवाहन बजरंग दलाने केले आहे.

सेवा है यज्ञ कुंड समिधा सम हम जले
ध्येय महासागर में सरित रूप हम मिले

असे म्हणत मावळातील पूरस्थितीत तळागाळातील प्रत्येक कार्यकर्ता मदतीसाठी पुढे सरसावला आहे. तुंग येथे सिताराम पाठारे यांच्या किराणा मालाच्या दुकानावर दरड कोसळल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जिवितहानी झाली नाही. मात्र त्याचे दुकान पुर्णपणे उध्वस्त झाले. दुकानातील मालाची नासधुस झाली. बजरंग दलाचे विभाग संयोजक संदेश भेगडे, जिल्हा सहसंयोजक बाळासाहेब खांडभोर, राजेंद्र घायाळ, सुभाष भोते, निलेश ठाकर आदींनी पाठारे कुटुंबाची भेट घेत त्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

त्याचबरोबर तुंग येथील निराधार कातकरी जेष्ठ महिलेला शिधा किट देत त्यांचीही आस्थेने विचारपूस करण्यात आली. शिवाय गावातील नुकसान झालेल्या प्रत्येक कुटुंबाच्या घरांची पाहणी केली.

तुंग गावातील निराधार आजी सुबद्राबाई दामु पाठारे यांचे घर या पावसामुळे पडले. त्यांना मुल बाळ नाही, निट कानाने ऐकाकायला येत नाही. डोळ्यांनी दिसत नाही. त्यांचे वय 75 वर्षांच्या पुढे आहे. त्यामुळे पाठारे यांचे घर बांधून देण्यासाठी या आजीला सर्वोतोपरी मदत करावी. त्यासाठी इच्छुकांनी बाळासाहेब खांड़भोर (9284353682), सुशील वाडेकर (8805637575) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बजरंग दलाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.