Pune : महापौर-उपमहापौरांनी मानले आभार; उद्या होणार नवीन पदाधिकाऱ्यांची निवड

एमपीसी न्यूज – महापौर मुक्ता टिळक आणि उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आज महापालिका सर्वसाधारण सभेत नगरसेवक, प्रशासन, कर्मचारी, पत्रकारांचे आभार मानले. जवळपास पावणे तीन वर्षांचा कालावधी या दोघांनाही मिळाला. या कालावधीत पुण्यातील अनेक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. आपले मतभेद जरी असले तरी मनभेद नसल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले. मुक्ता टिळक आज गैरहजर होत्या. त्यांच्या वतीनेही धेंडे यांनीच उपस्थितांचे आभार मानले. शुक्रवारी महापौर – उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे.

महापालिकेत भाजपचे 99 नगरसेवक आहेत. महापौर मुक्ता टिळक कसबा मतदार संघातून आमदार झाल्या आहेत. भाजपतर्फे महापौर पदासाठी अभ्यासू नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांना तर, उपमहापौर पदासाठी नगरसेविका सरस्वती शेंडगे यांना संधी देण्यात आली आहे. या दोघांचीही निवड निश्चित मानली जात आहे. केवळ औपचारिकता बाकी आहे. तर, राष्ट्रवादीतर्फे महापौर पदासाठी ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश कदम यांना, काँगेसतर्फे उपमहापौर पदासाठी नगरसेविका चांदबी नदाफ शेख यांना संधी देण्यात आली आहे.

काँगेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. या दोन्ही पक्षाचे केवळ 51 नगरसेवक होतात. शिवसेनेचे 10 नागरसेवक असून त्यांची भूमिका अद्यापही ठरलेली नाही. मनसेचे 2 आणि एमआयएमच्या एक नगरसेवकांची भूमिका ठरलेली नाही. शुक्रवारी सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.