Medicine : डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर मेडिकलमधून पॅकेटवर लाल रेषा असलेली औषधे घेताय? मग हे नक्की वाचा

एमपीसी न्यूज – भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने( Medicine ) एक्सवर काल (दि.10 मार्च)  एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये  ज्या औषधांच्या पॅकेटवर लाल पट्टी असते ती डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय घेऊ नयेत, असे सांगण्यात आले आहे.

Warje : वारजे माळवाडीचे रुग्णालय पाडून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या भूमिपूजनाची घाई कशासाठी? – मुकुंद किर्दत

कधी कधी आपण किरकोळ आजारासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर मेडिकलमधून  औषध आणतो, असे करणे धोकादायक ठरू शकते. परंतु लोक या गोष्टींबाबत फारसे गंभीर नाहीत.

https://x.com/MoHFW_INDIA/status/1766688920472023254?s=20

अशी लाल पट्टी असलेली औषधे खाण्यापूर्वी काही गोष्टी तपासणे खूप महत्त्वाचे आहे.  ही लाल रेषा नेमकी का असते, याबाबत  भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने  एक्सवर काल एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी ज्या औषधांच्या पॅकेटवर लाल पट्टी असते ती डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय घेऊ नयेत. या औषधांमध्ये प्रतिजैविक मुख्य आहेत. डॉक्टरांना सांगूनच औषधे घ्यावीत असे म्हटले आहे.

म्हणूनच  स्वत: किंवा दुकानदाराच्या सांगण्यावरून कोणतेही औषध घेऊ नका. डॉक्टरांचा सल्ला घेणे ( Medicine ) आवश्यक आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.