MSEDCL : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर वीज कंत्राटी कामगारांचा संप स्थगित

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघटना ( MSEDCL) संयुक्त कृती समितीच्या वतीने 5 मार्च पासून महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीमध्ये बेमुदत आंदोलन चालू होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 9) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सर्व संयुक्त कृती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची नागपूर येथे बैठक झाली. फडणवीस यांनी कामगारांना दिलेल्या आश्वासनानंतर कामगारांनी संप स्थगित केला.

या बैठकीमध्ये माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. कंत्राटी कामगारांचे प्रश्न हे गहन असून कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर शासन कटिबद्ध आहे. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांना पोसता येईल एवढे वेतन मिळाले पाहिजे ही भूमिका सरकारची आहे, असे ऊर्जामंत्री फडणवीस म्हणाले. निश्चितच कंत्राटी कामगारांचे योगदान हे वीज कंपन्यांसाठी मोठे असल्यामुळे शासन त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. संयुक्त कृती समितीने दिलेल्या सर्व समस्यांवरती सरकार सकारात्मक विचार करणार आहे असे उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

Medicine : डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर मेडिकलमधून पॅकेटवर लाल रेषा असलेली औषधे घेताय? मग हे नक्की वाचा

या बैठकीत कंत्राटी कामगारांच्या पत्रातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा झाली ( MSEDCL)आणि हितार्थ अनेक निर्णय घेण्यात येथील असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तिन्ही वीज कंपनीतील वीज कंत्राटी कामगाराना वेतनात वाढ करण्यासाठी तिन्ही कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय घेणार. पूर्वाश्रमीच्या रोजंदारी कामगार पद्धती ( एन.एम.आर ) नुसार अथवा हरियाणा राज्याप्रमाणे कंत्राटदार विरहित रोजगार देण्याबाबत विचार करणार.

तिन्ही कंपनीत भरतीसाठी वयोमर्यादा 45 करणार. कंत्राटी कामगारांना प्रत्येक वर्षाला पाच असे एकूण पाच वर्षाच्या अनुभवानुसार 25 मार्क देण्यात येतील. कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा त्यांना भरतीसाठी अर्ज करेपर्यंत वितरण व पारेषण भरती प्रकिया थांबविण्यात येईल. शैक्षणिकदृष्ट्या पात्र कुशल व अनुभवी कामगारांची यादी बनवून त्यांना टप्या टप्यात कायम करण्याबाबत सकारात्मक विचार करणार. शैक्षणिक दृष्टया अपात्र कामगाराला बेरोजगार न करता त्याला ट्रेनिंग देऊन सर्टिफिकेट देणार.

कंत्राटी कामगाराला वयात सवलत देणार. कंत्राटी कामगाराला आरक्षण देण्याबाबत विचार करणार. सेवा निवृत्त कामगारांना ग्रच्युईटी देण्याबाबत सकारात्मक भुमिका घेतली जाईल. सेवा निवृत्त कामगारांच्या वारसाला कंत्राटी सेवेत घेण्याबाबत विचार केला जाईल. बदमाश कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार. सर्व कामगारांना वेतन थेट त्यांचा बँक खात्यात खात्यात देणार. तसेच एखाद्या कंत्राटी कामगाराचा दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्यासाठी 20 लाखाचा विमा काढणार. कंत्राटी कामगारांच्या कुटुंबाला मेडीक्लेम देण्याचा विचार करणार. कोर्ट संरक्षित व शैक्षणिक अपात्र कमी केलेले कामगार पुन्हा कामावर घेणार.  कामगारांच्या वेतन रकमेचा शासकीय संविधानिक देय रकमेचा अपहार करणाऱ्या भ्रष्ट कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार, अशी आश्वासने उर्जामंत्री फडणवीस यांनी दिली.

वरील सर्व निर्णयावर चर्चा झाली. त्यात सर्व कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून एक मुखाने या सर्व चर्चेला सकारात्मक घेतले आणि या सर्व मागण्या आगामी काळात लवकर अमलात आल्या पाहिजेत, अशी आशा व्यक्त करत संप स्थगित ( MSEDCL)  केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.