Moshi : दारू प्यायला पैसे न दिल्याने पत्नीचा खून

एमपीसी न्यूज – पत्नीने दारू प्यायला पैसे न दिल्याने पतीने पत्नीच्या ( Moshi)  डोक्यात लोखंडी रॉडने मारून तिचा खून केला. हे घटना रविवारी (दि. 10) मोशी येथे घडली.

जयश्री मारुती बाबना (वय 47, रा. सिल्वर करिष्मा बिल्डिंग समोर शिवाजीवाडी, मोशी) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. मारुती बाबना (वय 50) असे आरोपी पतीचे नाव आहे.

MSEDCL : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर वीज कंत्राटी कामगारांचा संप स्थगित

पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती याला दारूचे व्यसन आहे. त्याने रविवारी पत्नी जयश्री यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र जयश्री यांनी पती मारुती याला दारू प्यायला पैसे देण्यास नकार दिला. या कारणावरून मारुती याने जयश्री यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून त्यांना गंभीर जखमी केले. त्यातच जयश्री यांचा मृत्यू झाला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत ( Moshi)  आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.