Nigdi News : ‘रोटरी क्लब ऑफ आकुर्डी’ तर्फे वृध्दाश्रमात औषधे वाटप

एमपीसी न्यूज – ‘रोटरी क्लब ऑफ आकुर्डी; तर्फे प्राधिकरण येथील संत मोनीबाबा वृध्दाश्रम आणि किवळे येथील स्नेह सावली वृध्दाश्रमातील वृद्धांसाठी नियमित लागणारे औषधे देण्यात आली.

रोटरी क्लब ऑफ आकुर्डी तर्फे ही औषधे नियमितपणे देण्यात येतात. या प्रोजेक्टसाठी अध्यक्ष गौरव शर्मा, मेंबरशीप डायरेक्टर कल्याणी कुलकर्णी, पब्लिक इमेज डायरेक्टर सिमा शर्मा, अँडमिन डायरेक्टर अनिंदिता मुखर्जी, पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन श्री गूल सेवलानी, रोटेरियन गौतम शहा, राजेंद्र तुपे, अशोक मेहेर, वैशाली मेहेर यावेळी उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमाअंतर्गत संत मोनीबाबा वृध्दाश्रम आणि किवळे येथील स्नेह सावली वृध्दाश्रमातील वृद्धांसाठी नियमित लागणारे औषधे मोफत देण्यात येतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.