Akurdi Crime News : आकुर्डीत सशस्त्र दरोडा घालणाऱ्या टोळीला बेड्या

एमपीसी न्यूज – आकुर्डी येथील किसन पांढारकर चाळ पंचतारानगर येथे टोळक्याने सशस्त्र दरोडा टाकला. टोळक्याने महिलेच्या घरात घुसून तलवार व कोयत्याने तोडफोड करत रोख रक्कम लुटून नेली. ही घटना रविवारी (दि. 3) रात्री सव्वासात वाजताच्या सुमारास घडली. या टोळीतील चार जणांना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

बोन्या उर्फ बोनूप्रसाद हंसराज जयस्वाल, संपत उर्फ पप्प्या महाबली जयस्वाल, अजित छोटेलाल जयस्वाल, रुपेश रायसाहेब जयस्वाल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्यासह त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी निर्मला ऋषीकेश तळवार (वय 38) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेच्या घरात घुसून हातामध्ये तलवार व लोखंडी कोयता घेऊन तलवारीने खिडकीची काच फोडली. तसेच दहशत निर्माण करून फिर्यादी यांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या पर्समधून दोन हजार शंभर रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली.

याबाबत फिर्यादी यांनी त्यांच्या पतीला फोनवरून माहिती दिली. पतीने थेट पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. पोलीस आयुक्तांनी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार निगडी पोलिसांनी घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या रेनबो गार्डनजवळ काहीजण संशयितरित्या थांबल्याचे दिसले. त्यांच्याकडे शस्त्रे असल्याने पोलिसांनी देखील पोलीस बळाचा वापर करून चौघांना बेड्या ठोकत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, स्वाती खेडकर, पोलीस उपनिरीक्षक केरबा माकणे, पोलीस अंमलदार किशोर पढेर, विक्रम जगदाळे, रमेश मावसकर, सतिश ढोले, शंकर बांगर, अमोल सांळुखे, राहुल मिसाळ, भुपेंद्र चौधरी, विनोद होनमाने, विलास केकाण, विजय बोडके, तुषार गैंगजे, उमेश मोहिते, कंठय्या स्वामी, तानाजी सोनवणे, सोनु केंगले, विठ्ठल भारमळ, सचिन मुळे, गणेश कोकाटे, बाळासाहेब नंदर्गे, प्रकाश गरदरे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.