Pune : ‘आयुर्वेदिक भस्म विचारमंच’ स्थापनेसाठी 1 फेब्रुवारीला पुण्यात बैठक

इंडियन ड्रग्ज रिसर्च असोसिएशनचा पुढाकार 

एमपीसी न्यूज – ‘आयुर्वेदिक भस्म विचारमंच’ स्थापनेसाठी 1 फेब्रुवारी रोजी पुण्यात बैठक आयोजित करण्यात आली असून इंडियन ड्रग्ज रिसर्च असोसिएशनने त्यासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती डॉ. उल्हास जोशी यांनी दिली.   
आयुर्वेदिक भस्मे एक उपयुक्त औषधी कल्पना असून ही सध्या चर्चेचा विषय बनला आहे. आयुर्वेदिक भस्म करण्याच्या पद्धती, चांगल्या कच्चा मालाची उपलब्धता, त्यांची शुद्धता अशा ब-याच बाबींचा उहापोह करणे आवश्यक आहे. त्यासाठी भस्मे तयार करणारे व वापरणारे वैद्य व कारखाने यांनी एकत्र येऊन त्यावर विचारांचे आदान प्रदान करणे आवश्यक आहे.

इंडियन ड्रग्ज रिसर्च असोसिएशन असा एक कायमचा विचारमंच तयार करणार  आहे. ज्यांना भाग घेण्याची इच्छा आहे. त्यांनी एकत्र यावे. यासाठी पहिली बैठक १ फेब्रुवारी रोजी, शनिवारी, दुपारी 3 ते 5 या वेळात आयोजित केली आहे. इंडियन ड्रग्ज रिसर्च असोसिएशन, शिवाजीनगर येथे ही बैठक होईल. विनाशुल्क नाव नोंदणीसाठी डॉ. उल्हास जोशी 9422037912 यांना संपर्क करा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.