Metro News : मेट्रोचा दुसऱ्या टप्प्यातील बारा किलोमीटरचा मार्ग होणार सुरू

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Metro News) स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक ही मार्गिका सन 2022 मध्ये सुरू झाली. त्यानंतर आता फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक आणि गरवारे कॉलेज स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक येथून रुबी हॉल स्थानक या मार्गिका लवकरच प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार. पहिल्या टप्प्यात 12 किलोमीटर अंतरावर मेट्रो सुरु झाली. आता दुसऱ्या टप्प्यात 13 किलोमीटर सुरु होणार आहे.

गरवारे स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज या मार्गिकेवर मेट्रो रेल्वेची चाचणी 25 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आली. त्याचप्रमाणे फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मार्गावर 31 डिसेंबर 2022 रोजी चाचणी घेण्यात आली. तसेच 30 मार्च 2023 रोजी सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक मंगळवार पेठ (RTO) – पुणे रेल्वे स्थानक – रुबी हॉल स्थानक या मार्गावर चाचणी घेण्यात आली.

या तिन्ही मार्गावरील कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. उर्वरित कामे पुढील महिनाभरात पूर्ण होतील. त्यानंतर या मार्गीकाचे सीएमआरएस निरीक्षण करण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्त यांना बोलावण्यात येईल. त्यांची मान्यता मिळताच पुढील मार्गावर मेट्रो धावणार आहे.

सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक ते रुबी हॉल स्थानक या मार्गावर मंगळवार पेठ (RTO), पुणे रेल्वे स्थानक, रुबी हॉल स्थानक ही महत्त्वाची स्थानके आहेत. यामुळे आरटीओ कार्यालय, पुणे रेल्वे स्थानक, रुबी हॉल, जहांगीर हॉस्पिटल, वाडिया कॉलेज जोडले जाणार आहेत.

यामुळे मोठ्या प्रमाणावर पुण्याच्या नागरिकांना या भागात येणे-जाणे सोयीचे होणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाला मेट्रोच्या कॉनकोर्स मजल्याशी जोडण्यात आल्यामुळे रेल्वे आणि मेट्रो प्रवाशांना थेट एकमेकांच्या सेवांचा लाभ घेणे सोईचे होणार आहे.

मेट्रो स्थानकावरून रेल्वेच्या सर्व फलाटावर जाणे सहज शक्य होईल, मंगळवार पेठ स्थानक (RTO) हे अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी आहे. आरटीओ कार्यालयात येणाऱ्या असंख्य नागरिकांना (Metro News) याचा फायदा होईल. तसेच या भागात शाळा इंजिनिअरिंग कॉलेज, नायडू हॉस्पिटल ही महत्वाची ठिकाणे आहेत. या मार्गावर रोज प्रवास करणाऱ्या तीन ते चार हजार विद्यार्थ्यांना या मेट्रो स्थानकामुळे फायदा होणार आहे

डेक्कन आणि छत्रपती संभाजी स्थानक ही स्थानके लवकरच प्रवाश्यांसाठी खुली होणार आहेत. यामुळे पीसीएमसी ते जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर, मॉडर्न कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, डेक्कन जिमखाना, नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता इत्यादी अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांना मेट्रोद्वारे जाणे सहज शक्य होणार आहे. या स्थानकांवर जाण्यासाठी पादचारी पुलाद्वारे जंगली महाराज रस्ता व फर्ग्युसन कॉलेज रस्ता येथून जाणे शक्य होणार आहे.

या दोन्ही स्थानकांना पेठ भागाशी जोडण्यासाठी पादचारी केबल सस्पेंडेड पुलाचे काम देखील प्रगतीपथावर आहे त्यामुळे नारायण पेठ ते डेक्कन स्थानक व छत्रपती संभाजी स्थानक ते शनिवार पेठ ही दोन्ही ठिकाणे पादचारी पुलाद्वारे जोडली जाणार आहेत यामुळे शनिवार पेठ, नारायण पेठ आणि त्या लगतच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मेट्रोद्वारे शहराच्या विविध भागात जाणे शक्य होणार आहे.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले, “लवकरच पीसीएमसी ते वनाझ व पीसीएमसी ते रुबी हॉल असा थेट प्रवास करणे प्रवाशांना शक्य होणार आहे.”

Pimpri : माळी समाज मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद 

दुसऱ्या टप्प्यातील मार्ग – अंतर (स्थानके)

फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट – 8 किलोमीटर (दापोडी, बोपोडी, शिवाजीनगर)

सिव्हिल कोर्ट ते रुबी हॉल – 2.37 किलोमीटर (आरटीओ, पुणे रेल्वे स्थानक)

गरवारे कॉलेज ते सिव्हिल कोर्ट – 2.75 किलोमीटर (डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पीएमसी)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.