Metro : निगडी ते हिंजवडी नवीन मेट्रो मार्ग होणार

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांची माहिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यावरील वाहतुकीचा अभ्यास (Metro) करण्यात येणार आहे. रस्त्यावरुन प्रत्येक तासाला दुचाकी, चारचाकी, बस, ट्रक, तीनचाकी अशी किती वाहने धावतात. त्याचा अभ्यास केला जाणार असून  निगडी ते हिंजवडी अशी नवीन मेट्रो मार्गिका तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

निगडीपर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.या विस्तारित मार्गावर चिंचवड स्टेशन, आकुर्डीतील खंडोबा माळ चौक आणि निगडीतील भक्ती-शक्ती समुह शिल्प चौक असे तीन स्थानके असणार आहेत.

हा मार्ग 4.414 किलो मीटर लांबीचा असून तो उन्नत असणार आहे. खर्चात केंद्र सरकार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समप्रमाणात वाटा असेल. राज्य सरकारही निधी देणार असून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 910.18 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

Maratha Reservation : कुणबी नोंदी शोधण्यासाठी आता राज्यभर मोहिम

निगडीपर्यंतच्या मेट्रो कामाची निविदा प्रक्रिया सुरु झाली आहे. जागेची काही अडचण नाही. स्थानकांवर येणे-जाण्यासाठीच जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे. तीन महिन्यात प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. साडेतीन वर्षात काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.

मेट्रोने प्रवास करणा-यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे प्रत्येकाचा वाहनासाठी पार्किंगची व्यवस्था करणे शक्य नाही. त्यामुळे नागरिकांनी  मेट्रो स्थानकापर्यंत पायीच येणे अपेक्षित आहे. त्यासाठी पादचारी मार्ग विकसित केले जात आहेत.

स्थानकापर्यंत येण्यासाठी पीएमपीएमएल, रिक्षाची व्यवस्था सुरु करण्याचे नियोजन आहे. पुणे महामेट्रोच्या प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. पूर्णक्षमतेने मेट्रो सुरु झाली नसल्याने मेट्रो तोट्यातच आहे. मेट्रो प्रवाशांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेत असल्याचेही त्यांनी (Metro)  सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.