Mumbai News : मिलिंद सोमणवर अश्लीलता पसरविल्याचा खटला दाखल 

एममपीसी न्यूज  : मिलिंद सोमण याने वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 4 नोव्हेंबर रोजी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून स्वतःचा एक न्यूड फोटो पोस्ट केला होता. ज्यात तो समुद्र किनारी धावताना दिसला. त्याच्या या न्यूड फोटोवरून मोठ्या प्रमाणात त्याच्यावर टीका होत असून या फिटनेस प्रमोटर मॉडेल, अभिनेत्यावर या फोटोच्या माध्यमातून अश्लीलता पसरविल्याच्या आरोपावरून खटला दाखल करण्यात आला आहे.

भारतीय दंड संहितेच्या कलम 292 आणि कलम 67 अंतर्गत मिलिंद सोमण याच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.

अश्लील कृती किंवा गाण्याबद्दल 292 आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात अश्लील साहित्य प्रकाशित करण्याबद्दल 67 ही कलमे लावण्यात येतात. मॉडेल म्हणून करिअर सुरू करणारा मिलिंद सोमण याने नंतर बॉलिवूडमध्ये डेब्यु केला. काही चित्रपटांतून कामही केले. पण अभिनेता म्हणून तो फारसा यशस्वी होऊ शकला नव्हता. काही दिवसांपूर्वी तो एका वेब सिरीजमध्ये दिसला होता. पण सध्या तो फिटनेस प्रमोटर म्हणून प्रसिद्ध आहे. तो आपले वर्कआउटचे फोटो वेळोवेळी सोशल मीडियावर शेअर करत असतो. तो आपल्या चाहत्यांना फिटनेससंदर्भात मार्गदर्शन करतो. व्यायामाचे महत्त्व पटवून देण्याचे काम तो करतो.

 

4 नोव्हेंबर रोजी त्याचा वाढदिवस असतो. या निमित्ताने त्याने सोशल मीडियावर त्याचा एक फोटो शेअर केला ज्यामध्ये तो समुद्र किनाऱ्यावर धावताना दिसला. पण या फोटोमध्ये त्याने अंगावर एकही कपडा घातलेला नाही. पूर्णपणे न्यूड होऊन तो पळताना दिसला. यामध्ये त्याची फिट बॉडी पूर्णपणे दिसून आली. या फोटोवरोबर त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हॅपी बर्थडे टू मी.’ या फोटोमुळे सध्या सोशल मीडियावरून त्याच्यावर खूपच टीका होता आहे. आता त्याच्या या फोटोवरून त्याच्यावर अश्लीलता पसरविल्याचा आरोप करून खटला दाखल करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.