Pune : कोरेगाव पार्कमधील सेक्स रॅकेट उद्धवस्त; 3 परदेशी तरुणींसह 5 जणींची सुटका

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील कोरेगाव पार्क परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. (Pune) पोलिसांनी या ठिकाणाहून पाच तरुणींची सुटका केली. यातील तीन तरुणी या परदेशातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर व्यवस्थापक असलेल्या प्रशांत रामकृष्ण दंडगे (वय 40) याला अटक केली आहे. पोलीस नाईक रेश्मा कंक यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की,  कोरेगाव पार्क येथील हेल्थ अँड क्लिनीक, थाई स्पा व हेल्थ स्पॉट क्लिनीक थाई स्पा या ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती. पोलिसांनी याठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. (Pune) त्यानंतर तेथे छापा टाकला. तेव्हा तेथे 5 तरुणींकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याचे आढळून आले.

Pune : शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्य अहवालाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या प्रकाशन

वेश्याव्यवसाय करणाऱ्या या पाचही तरुणींची सुटका करून त्यांची (Pune) रवानगी रेस्क्यू फाउंडेशन या ठिकाणी करण्यात आली. तर स्पाचा व्यवस्थापक असलेल्या दंडगे याला अटक केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.