Dairy Farm : मिलिटरी डेअरी फार्म रेल्वे गेट वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार

एमपीसी न्यूज : आज संध्याकाळी पिंपरी येथील मिलिटरी डेअरी फार्म (Dairy Farm) रेल्वे गेट येथील काम पूर्ण करून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती आनंद भोईटे (उप आयुक्त, वाहतूक विभाग, पिंपरी चिंचवड) यांनी दिली आहे.

रेल्वे रूळ दुरुस्ती व इतर कारणासाठी पिंपरी येथील मिलिटरी डेअरी फार्म रेल्वे गेट काल रविवारी बंद करण्यात आला. दिवाळीसाठीची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक पिंपरी बाजारपेठेत गेले होते. तसेच मिलिटरी डेअरी फार्म रेल्वे गेट बंद असल्याने पिंपरीगाव व कॅम्पमधील रहिवाश्यांना पुणे-मुंबई हायवेला जाण्यासाठी साई चौक जवळील बोगद्याच्या उपयोग करावा लागत होता. त्यामुळे पिंपरी बाजार पेठेतील रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढून वाहतूक कोंडी झाली होती.

भोईटे म्हणाले, कि यामुळे आज पिंपरी वाहतूक विभागाचे (Dairy Farm) अधिकारी व कर्मचारी मिलिटरी डेअरी फार्म रेल्वे गेट येथे गेले होते. त्यांनी रेल्वेच्या ठेकेदाराला सांगितले, कि गेट बंद असल्याने पिंपरी बाजारपेठेत तीव्र वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम दिवाळी नंतर करावे व गेट वाहतुकीसाठी उघडावे. ठेकेदाराने सांगितले, कि आज संध्याकाळपर्यंत काम पूर्ण होईल व त्यानंतर गेट उघडता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.