Pimpri News: जेष्ठ नागरिक संस्थेचा 23 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील ज्येष्ठ नागरिक संस्थेचा 23 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 10 वी, 12 वी मध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या नातवंडांचा गुणगौरव करण्यात आला. वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

क्रीडा स्पर्धेतील विजेत्या महिला व पुरुष यांना माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने स्मृतिचिन्ह चिन्ह देवून गौरवण्यात आले. महिलानी भजनी मंडळात भजने सादर केली. काही गीते सादर करण्यात आली. अध्यक्षस्थानी दुंडय्या स्वामी होते. सामाजिक कार्यकर्ते उदय वासरे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लाभले. या प्रसंगी माजी नगरसेवक संदीप वाघेरे, माजी नगरसेविका निकिता कदम, माजी महापौर संजोग वाघेरे, पिंपरी-चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष अरुण बाग, कार्याध्यक्ष वृषाली मरळ,  बाळकृष्ण माडगुळकर, शांताराम सातव, गजानन ढमाले, ईश्वर चौधरी हे विभागीय उपाध्यक्ष तसेच सल्लागार पंडीत खरात उपस्थित होते.

Dehu Road Traffic : देहूरोड बाजार पेठेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी आजपासून नवीन नियम लागू होणार

पिपरी संघाचे अध्यक्ष दत्तोबा नाणेकर उपस्थित होते. संस्थेचे सचिव अशोक कु‌दळे यांनी अहवाल वाचन केले. कार्याध्यक्ष सुधाकर यादव यांनी प्रास्ताविक व संस्थेची माहिती दिली. कोषाध्यक्ष वसंत तावरे यांनी वार्षिक जमाखर्चाचे वाचन केले. उपस्थित सर्व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. पाहुण्यांच्या हस्ते संस्थेच्या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करून संस्थेच्या कार्याविषयी समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

सुब्रतो मुजुमदार, उदय वाघेरे यांचे कार्यक्रमास विशेष सहकार्य लाभले. कान्पना देशमुख,  भूपाल किविल यांनी मार्गदर्शन केले. कैलास भुजबळ यांनी उपस्थितांचे आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.