Pimple Nilakh Fire : पिंपळे निलखमधील घरात गॅस गळतीमुळे किरकोळ आग

एमपीसी न्यूज – पिंपळे निलखमधील घरात गॅस गळतीमुळे किरकोळ (Pimple Nilakh Fire)  आग लागल्याची घटना शुक्रवारी घडली.

 

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या मुख्य कार्यालयाचा व रहाटणी उपविभाग कार्यालयाचा प्रत्येकी एक बंब घटनास्थळी पोहोचले. कर्मचाऱ्यांनी सांगितले की, त्यांना आगीचा कॉल शुक्रवारी सकाळी 6.06 वा   आला होता.पिंपळे निलखच्या पंचशीलनगरमधील एका घरात ही घटना घडली.

 

Today’s Horoscope 8 July 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

 

गॅस सिलेंडच्या रेगुलटरमधून गॅस गळती होऊन तिथे आग लागली होती.घरच्यांनी प्रसंगावधान राखत सिलेंडरवर ओली साडी लगेच गुंडाळली.अग्निशमन कर्मचारी तेथे पोहोचले व त्यांनी रेगुलटर काढुन सिलेंडर सील केला.सुदैवाने आग कुठे पसरली नाही व कोणतीही जीवित व मालमत्तेची हानी झाली नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.