Sambhaji Brigade : CMO कार्यालयात पूजा, संभाजी ब्रिगेडकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निषेध

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्रालयातील दालनात पूजा केली होती. या कृतीचा आता संभाजी ब्रिगेडकडून (Sambhaji Brigade) निषेध केला जातोय. राज्य सरकार हे धर्मनिरपेक्ष आहे असे असतानाही मुख्यमंत्री यांनी आपल्या कार्यालयात पूजा करून राज्यघटनेचा अवमान केला असल्याचे संभाजी ब्रिगेडने म्हटलं आहे. 

 

Pimple Nilakh Fire : पिंपळे निलखमधील घरात गॅस गळतीमुळे किरकोळ आग

 

 

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे म्हणाले, राज्य सरकार हे धर्मनिरपेक्ष असते. जर प्रत्येक जण आपापल्या धर्माच्या धार्मिक विधी करायला लागला तर याचा अर्थ आपण राज्यघटनेचा अवमान करत आहोत असेच होईल. कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयात पूजाअर्चा करायच्या नाहीत असा राज्य सरकारचा अध्यादेशाच (Sambhaji Brigade) आहे. आपल्या धार्मिक परंपरा या आपल्या घरात उंबऱ्याच्या आत असल्या पाहिजेत.
मुख्यमंत्री पदावर येणारे हे बंडखोर असतील व्यभिचारी असतील, राजकीयदृष्ट्या त्यांनी गद्दारी केलेली असेल, प्रतारणा करणारे लोक आपले पाप धुण्यासाठी जर विधिवत पूजा करणार असतील तर हा धर्माचासुद्धा अनादर असल्याचे संतोष शिंदे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.