Pimpri : मीटर उपलब्ध असल्याचे सांगून महावितरण करतेय ग्राहकांची दिशाभूल 

172

एमपीसी न्यूज – पैसे भरूनही ग्राहकांना वीज मीटर मिळत नसताना महावितरणने मात्र मीटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे विविध पत्रकाद्वारे केलेल्या खुलाशा बाबत व एका ग्राहकाने सिंगल फेज मीटरसाठी प्रादेशिक संचालक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यांचा भ्रमणध्वनीहून  पर्दाफाश केला आहे.   मीटर उपलब्ध असल्याचे सांगून महावितरण करतेय ग्राहकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप विद्युत सनियंत्रण  समितीचे जिल्हा सदस्य संतोष सौंदणकर यांनी  निवेदनांत महावितरणला केला आहे. 

महावितरणला दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की. विविध वृत्तपत्रामधून महावितरणने पुरेशा प्रमाणात मीटर उपलब्ध असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहे. हि बातमी देत असताना विविध वृत्तपत्रातून रोज वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजेच आज मीटर्स उपलब्ध आहेत, मीटर्स येणार आहेत व कधी तुटवडा आहे अश्या विविध प्रकारच्या बातम्या गेल्या आठ दिवसात प्रसिद्ध केल्या आहेत.

सप्टेंबर महिन्यात सुमारे २ लाख ६० हजार मीटर्स उपलब्ध होतील हे सांगत असताना त्यांनी सप्टेंबर महिन्यात कोणत्या तारखेला मीटर्स उपलब्ध होतील या बाबत काहीही सांगितलेले नाही. त्यानंतर पुढील प्रत्येक महिन्यात ३ लाख ८० हजार वीज मीटर्स उपलब्ध केले जातील २०१९ च्या मे महिन्यापर्यंत ३० लाख मीटर्स महावितरणला मिळणार हे पुणे प्रादेशिक कार्यालयाने सांगितले असताना येथे हे स्पष्ट होते कि महावितरणकडे आजमितीस ज्या ग्राहकांनी वीज जोडणीसाठी पैसे भरले.त्यांना   देण्यासाठी  मीटर्स आजही उपलब्ध नाहीत. याबाबत वाणिज्य, औद्योगिक, शेती व घरगुती प्रकारच्या पेड पेंडिंग ग्राहकांची पुणे जिल्ह्यातील विभागवार यादी जाहीर करावी. जेणे करून दुध का दुध पाणी का पाणी स्पष्ट होईल.
पुणे प्रादेशिक कार्यालयाने मागील काही महिन्यांपासून केंद्र शासन पुरस्कृत सौभाग्य योजना व दीनदयाळ उपाध्याय योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात वीज जोडण्या देण्यात आल्या त्या जोडण्या देताना जे मीटर्स वापरण्यात आले ते जुने मीटर्स वापरल्याची माहिती समोर येत आहे. याठिकाणी वापरलेले मीटर्स हे चाचणी  विभागात तपासणी न करता लावले गेले आहेत अशी चर्चा आहे. याबाबत मात्र महावितरणने कोणतीही सबब दिलेली नाही. त्यांनी योग्य तो खुलासा अथवा खंडन केलेले नाही.

महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक कार्यालयाकडून संपूर्ण राज्यात जुनी इलेक्ट्रो-मेकॅनिकल मीटर्स व नादुरुस्त मीटर्स बदलण्याची मोहीम राबविण्यात आली त्यामुळे काही ठिकाणी थोड्या फार प्रमाणात मीटरचा तुटवडा जाणवलं होता हे त्यांनीच मान्य केले आहे. त्यांनी पुन्हा आता राज्यात कुठेही मीटर्सचा तुटवडा नाही हे तेच सांगत आहेत यातून महावितरण पुणे प्रादेशिक संचालक कार्यालयाची विसंगत भूमिका लक्षात येते.

 

HB_POST_24_Oct
HB_POST_END_FTR-A3
%d bloggers like this: