Pune : मागील वर्षात 2 लाखांवर विक्रमी नवीन वीज जोडण्या

एमपीसी न्यूज – नवीन वीज जोडण्या देण्यासाठी महावितरणच्या ( Pune)  पुणे परिमंडलाने वेगवान व तत्पर कार्यवाही करीत सन 2023 मध्ये सर्व वर्गवारीमध्ये विक्रमी 2 लाख 34 हजार810 नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत. सन 2022 च्या तुलनेत तब्बल 57 हजार 579 अधिक वीजजोडण्या दिल्या आहेत. एका वर्षात दोन लाखांपेक्षा अधिक नवीन वीजजोडण्या देण्याची पुणे परिमंडलाने प्रथमच कामगिरी केली आहे.

पुणे परिमंडलामध्ये दरवर्षी दीड ते पावणेदोन लाख नवीन वीज जोडण्या देण्यात येतात. मात्र मागीलवर्षी जानेवारीपासून वीज जोडण्या देण्यास नियोजनपूर्वक वेग देण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्राहकसेवा गतीमान करण्यासोबतच प्रामुख्याने नवीन वीज जोडण्यांना आणखी वेग देण्याची सूचना केली. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनीही राहणीमान सुलभता (Ease of Living) प्रमाणे ग्राहकसेवा गतिमान करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पुणे परिमंडलामध्ये नवीन वीज जोडण्यांचा वेग वाढविण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले.

Pune: पुणे महापालिकेतर्फे युवादिनानिमित्त उद्यापासून विविध कार्यक्रम

नवीन वीज जोडण्यांसाठी मीटरचा आवश्यकतेनुसार व तात्काळ पुरवठा व्हावा यासाठी मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी मागील जानेवारीपासून दर आठवड्यामध्ये दोनदा विभागनिहाय नवीन वीज जोडण्या व मीटर उपलब्धता याबाबत आढावा घेणे सुरु केले आहे. त्यामुळे नवीन वीज जोडणी देण्याची प्रक्रिया अधिक गतीमान झाला व जानेवारी ते डिसेंबर 2023 मध्ये तब्बल 2 लाख 34हजार 810 नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या. या तुलनेत सन 2022 मध्ये एकूण 1 लाख 77 हजार 231 नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या होत्या.

सन  2023मध्ये घरगुती- 1 लाख 98 हजार 659 , वाणिज्यिक- 26 हजार 866 , औद्योगिक- 3 हजार 768 आणि कृषि व इतर 5517 अशा एकूण 2 लाख 34 हजार 810 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या. यामध्ये पुणे शहरात 1 लाख 441 , पिंपरी चिंचवड शहरात 72 हजार 466 आणि ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये 61 हजार 903 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. पुणे परिमंडल अंतर्गत यापूर्वी दरमहा 15  ते 16 हजार वीज जोडण्या देण्याचा वेग होता तो आता सन 2023 मध्ये 19  हजार 550  वर गेला. तर मागील एप्रिलपासून हा वेग 20  हजार 100 वर गेला ( Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.