Pune: पुणे महापालिकेतर्फे युवादिनानिमित्त उद्यापासून विविध कार्यक्रम

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिके मार्फत दि.12 जानेवारी रोजी जागतिक युवा दिना निमित्ताने(Pune) दि.09 जानेवारी पासून वास्तविक जीवनात पूर्णपणे ऐच्छिक आधारावर काम करून, तरुण लोकांशी कसे जोडले जावे तसेच स्थानिक लोकसमुदायामध्ये युवकांचे योगदान कसे असावे, हे समजण्यासाठी व्यावहारिक शिक्षण, समुदाय प्रतिबद्धता, वैविध्यपूर्ण कनेक्शन, सहयोगी प्रकल्प, युवा-केंद्रित शासन या विविध घटकांवर आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने मेरा युवा भारत (MY Bharat) ही (Pune)भारतातील युवा विकासासाठी मेरा युवा भारत (MY Bharat) हे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारोपाच्या कार्यक्रमात राष्ट्रीय एकता दिनाच्या औचित्यावर कर्तव्य पथ, नवी दिल्ली येथे डिजिटल प्लॅटफॉर्म “MY Bharat” https://www.mybharat.gov.in/ पंतप्रधान यांनी लॉन्च केले आहे.

डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रमुख उद्देश तरुणांच्या आवडीशी जुळणाऱ्या कामासाठी स्वयंसेवा कार्यक्रम करणे आणि प्रोफाईल पेजेस, इव्हेंटमध्ये सहभाग आणि अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रम वापरून मार्गदर्शक आणि समविचारी समवयस्कांशी जोडणे, तसेच समाजाचा एक भाग असण्याची भावना वाढवण्यासाठी आणि सामाजिक कारणांमध्ये व्यस्त राहण्यासाठी तसेच विविध क्षेत्रातील कार्यक्रममध्ये सहभागी होण्यासाठी आणि आयोजित करण्यासाठी, विकासात्मक कार्ये आणि नेतृत्व कौशल्य विकसित करणे ज्यामुळे तरुणांना समाजाशी जोडून घेता येईल हा आहे.

त्यानुसार उद्या दि.09 जानेवारी2024 रोजी लाईटहाऊस यांच्या सहयोगाने पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने “युवक कल्याणाशी संबंधित शासकीय योजनांबाबत जनजागृती सत्र” लाईट हाऊस, औंध येथे दु.01.00 ते 02.00 च्या दरम्यान आयोजन केले आहे. तरी बहुसंख्येने युवकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन पुणे महानगरपालिके मार्फत करण्यात आले आहे.

आगामी काळात पुणे महानगरपालिका व विविध स्वयंसेवी संस्थाच्या जसे एनएसएस, एनवायकेएस,कमिन्स इंडिया,स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था, जनवाणी, CFAR, अर्बन -95, लाइटहाउस कम्युनिटीज फाउंडेशन,यार्दी संस्था इ. सयुक्त विद्यामाने विविध कार्यक्रम जसे युवक कल्याणाशी संबंधित शासकीय योजनांबाबत जनजागृती सत्र, रस्ता सुरक्षा, उपेक्षित समाजातील सामाजिक योजना आणि नागरी सेवांचे पोस्टर बनवणे आणि प्रदर्शन (महिला, किशोरवयीन मुली आणि मुले), युवकांमध्ये व्यसनमुक्ती रॅलीद्वारे जनजागृती कार्यक्रम, वारसा स्थळांची स्वच्छता, नोकरीच्या मुलाखतीचे प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण, संवाद कौशल्य,मुलाखतीची तयारी,एमएस-एक्सेल, एमएस वर्ड आणि सीव्ही तयारी शिकणे, शहरातील रुग्णालयांमध्ये आरोग्य मित्र, शहरात आवाज आणि हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण, स्कूल ऑन व्हील्स/डोअर स्टेप स्कूल, मुलांचे शिक्षण/प्रशिक्षण/बांधकाम साइटवरील मुलांसाठी खेळाचे उपक्रम इ.उपक्रम राबविले जाणार आहेत.

तरी उपरोक्त नमूद वेबसाईटवर जास्तीत जास्त युवकांनी नोंदणी करून,  आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहनही महापालिका प्रशासनाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.