MNS News : पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे आणि साईनाथ बाबर प्रबळ इच्छुक

एमपीसी न्यूज – देशात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी (MNS News) सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात मनसेतर्फे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि माजी विरोधी पक्षनेते वसंत मोरे प्रबळ दावेदार आहेत. या दोघांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

बाबर आणि मोरे हे दोघेही खास मित्र आहेत. मनसेने पुणे लोकसभा मतदारसंघात जरी आपली ताकद पणाला लावली असली तरी पक्षांतर्गत वाद मिटवणे हे मनसे समोरचे आत्ताचे सर्वात मोठे आव्हान बनले आहे.

स्वतः अमित ठाकरे यांनी चार्ज घेतल्यानंतर देखील मनसेची अंतर्गत गटबाजी काही थांबायचं नाव घेत नाही. त्यामुळे या अंतर्गत गटबाजीचा फटका लोकसभा निवडणुकीला बसू शकतो, असे (MNS News) राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

मनसेकडून माजी शहराध्यक्ष वसंत मोरे, विद्यमान शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह गणेश सातपुते, बाबू वागस्कर आणि किशोर शिंदे हे नेते इच्छुक आहेत. पण, या सगळ्यांमध्ये साईनाथ बाबर आणि वसंत मोरे यांच्यात कमालीची चुरस पाहायला मिळत आहे.

Ajit pawar : इथला एक शहाणा म्हणतो की अजित पवार कॉन्ट्रॅक्टरला घेऊन फिरतो – अजित पवार

नुकतेच पुण्यातील कोंढवा परिसरात झालेल्या एका कार्यक्रमात राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर जर दिल्लीला गेले तर दुधात साखर पडेल असं म्हणत साईनाथ बाबर यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिल्याची चर्चा आहे. मात्र शर्मिला ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर लोकसभेसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी करत असणारे वसंत मोरे दुखावले गेले आहेत. त्यांनी आपली खदखद ही समाज माध्यमांवर मांडली होती.

‘कोणासाठी कितीही केलं तरी शेवटी फणा काढतातच पण मी पक्का गारुडी आहे.’ असं म्हणत आपली खदखद व्यक्त केली होती.
साईनाथ बाबर आणि वसंत मोरे यांनी पुणे लोकसभा निवडणुकीत गेल्या काही महिन्यांपासून जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.