Pune : मोबाईल डिस्ट्रीब्युटर्स कडून 91 लाखांचा माल उधारीवर घेऊन दुकानमालक फरार

एमपीसी न्यूज – पुण्यातील 15 मोबाईल डिस्ट्रीब्युटर्स कडून जवळपास 91 लाखांचा माल उधारीवर घेऊन बालाजीनगर धनकवडी येथील अनमोल टेलिकॉम मोबाईल शॉपीचा मालक दुकानाला कुलूप लावून फरार झाल्याचा धक्कादायक उघडकीस आला आहे. ही घटना मार्च 2018 ते नोव्हेंबर 2018 या कालावधीत घडली.

याप्रकरणी संजय शहा(वय 53, रा. सेंटर स्ट्रीट कॅंम्प) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय शहा यांचा मोबाईल डिस्ट्रीब्युटरचा व्यवसाय असून त्यांच्या घराच्या बिल्डिंगखाली त्यांचे पॉवर टेलिकॉम नावाचे दुकान आहे. बालाजीनगर येथे असलेल्या अनमोल टेलिकॉम नावाच्या मोबाईल दुकानाच्या मालकाने फिर्यादी संजय व पुण्यातील इतर 14 मोबाईल डिस्ट्रीब्युटर्सना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून उधारीवर विक्रीसाठी मोबाईल घेतले. यामध्ये त्याने 2 हजार 436 मोबाईल, 2 हजार 156 वेगवेगळी मोबाईल अॅक्सेसरीज व 12 टि.व्ही. असा 90 लाख 96 हजार 355 रूपयांची केलेली उधारी न देता करून दुकानाला कुलूप लावून 15 मोबाईल डिस्ट्रीब्युटर्सची फसवणूक केली. दुकानाचा मालक हा मुळचा राजस्थान येथील मेघवाल वासा येथील रहिवासी असून त्याचा शोध सुरू आहे.

याप्रकरणी पुढील तपास सहकारनगर पोलीस करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.