Pimpri News: महापालिका मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून असंसर्गजन्य आजाराचे रुग्ण शोधणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील असंसर्गजन्य आजाराचे रुग्ण शोधणे, त्याची तपासणी आणि उपचार याकरीता सीएसआर अंतर्गत बजाज यांच्यामार्फत मोबाईल मेडिकल युनिट (व्हॅन) उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या व्हॅनचे उद्घाटन महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते आज (शनिवारी) करण्यात आले. याच माध्यमातून महापालिका असंसर्गजन्य आजाराचे रुग्ण शोधणार आहे.

महापालिका कार्यक्षेत्रामध्ये असंसर्गजन्य आजाराचे रुग्ण शोधून, त्वरीत तपासणी व उपचाराकरीता एनसीएडी कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी सीएसआर अंतर्गत बजाज यांच्यामार्फत ही व्हॅन उपलब्ध होणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त व्हॅनमार्फत NCD कॅम्प राबविण्याचा शुभारंभ महापौर उषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली सांगवी रुग्णालयात करण्यात आला. या व्हॅनचे उद्घाटन महापौर ढोरे यांचे शुभ हस्ते करण्यात आले.

महापालिकेमध्ये “आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत महानगरपालिकेच्या विविध ठिकाणी NCD कॅम्प (असंसर्गजन्य आजार तपासणी शिबीर) आयोजित करण्यात आलेले आहेत. सदर मोबाईल मेडिकल युनिट (व्हॅन) ची यामध्ये मदत होणार आहे.

कार्यक्रमासाठी बाजाज कंपनीतर्फे व्हॅन सुपुर्द करताना सीएसआर सल्लागार सी.पी. त्रिपाठी, व्हीपी सीएसआर पंकज वल्लभ, सीएसआर गटप्रमुख व सीएसआर फिनसर्व अजय साठे, झोनल हेड लीना राजन, सहायक व्यवस्थापक बजाज संगिता वाळके, अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकिय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, ज्येष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर, पीसीएमसीचे सीएसआर समन्वयक विजय वावरे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वर्षा डांगे यांनी केले, तर आभार डॉ. पवन साळवे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.