Talegaon News : पुरातन गणपती मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त मोगरा महोत्सव

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील पुरातन गणपती मंदिरात अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. मोग-याच्या फुलांनी मंदिराचा गाभारा सजविण्यात आला होता तसेच अन्य फुलांचीही आरास करण्यात आली.

तळेगाव दाभाडे येथील गणपती चौकात पुरातन गणपती मंदिर आहे. या मंदिरात चैत्र कृष्ण चतुर्थी (अंगारकी संकष्टी चतुर्थी) निमित्त मंगळवारी (दि. १९) मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. श्रींचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती.

भक्तांच्या कल्याणासाठी सकाळी सात वाजता महाभिषेक करण्यात आला. हजारो सुगंधित पुष्पांच्या सजावटीने मंदिर परिसर सुवासिक झाला होता. रात्री श्रींची शेजारती संपन्न झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.