Pune : पोलीस हवालदार महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज- एक अज्ञात व्यक्ती पोलीस नियंत्रण कक्षातील महिलांना कार्यालयातील फोनवर अज्ञात क्रमांकावरुन कॉल करुन त्यांच्यासोबत अश्लील शब्दांत बोलत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना जुलै 2018  मध्ये घडली. याबाबत बंडगार्डन पोलीस ठाणे येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. एका 37 वर्षीय महिला कर्मचारी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी या नियंत्रण कक्षात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. तरी गेल्या एका महिन्यापासून नियंत्रण कक्षात अज्ञात क्रमांकावरून फोन येत असून फोनवर ही व्यक्ती पोलीस महिलांशी विनाकारण बोलत त्यांच्या कामात अडथळा निर्माण करत होता. तसेच काही महिला पोलीस कर्मचा-यांशी अश्लील भाषेत बोलत असे. विशेष म्हणजे, चार वेगवेगळे मोबाईल वापरून हे कृत्य केले गेले आहे. याबाबत पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.