Chinchwad : आपण कोकणी असल्याचा प्रत्येक कोकणवासियांना अभिमान- सुनिल तटकरे

कोकण- खेड तालुका अठरागाव रहिवासी विकास संस्थेचा स्नेहमेळावा उत्साहात

एमपीसी  न्यूज –   कोकणाने या देशाला अनेक रत्न दिले आहेत. कोकणी माणसाच्या अंगी चिकाटी, जिद्द, आत्मविश्‍वास आणि त्याचबरोबर कष्ट करण्याची तयारी यामुळे आज कोकणी माणसाचे देशभरात कौतुक केले जाते. त्यामुळे आपण कोकणी असल्याचा प्रत्येक कोकणीवासियांना अभिमान आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री सुनिल तटकरे यांनी केले. 

कोकण- खेड तालुका अठरागाव रहिवासी विकास संस्थेचा 18 वा स्नेहमेळावा नुकताचा चिंचवड येथे झाला. यावेळी या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व हिंद कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ. कैलास  कदम, संस्थेचे अध्यक्ष अशोक कदम, माजी नगरसेवक सदगुरु कदम, प्रमोद ताम्हाणकर, विजय सुतार, आनाजी शिर्के, मनोहर यादव, वसंत शिर्के, अरूण महाडिक, अनंत कदम, पांडूरंग जाधव, तुळशिराम यादव, पांडूरंग कदम, कॅप्टन श्रीपत कदम, दत्ताराम महाडिक, मारूती यादव, तुकाराम तांबट, धोंडू कदम, किरण यादव, सतीश मोरे, प्रदिप जंगम, राजेंद्र कदम, प्रविण कदम, सतीश झुझम, अनंत कदम आदि उपस्थित होते. तसेच  वैजयंती कदम, रोहिणी महाडिक, राजेश्री यादव, विजया सुतार, निर्मला  कदम, मनिषा कदम, संजना यादव, शितळ मोरे, रेश्मा चव्हाण आदी महिला सदस्या उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी देशातील तसेच अठरागावातील मृतांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

यावेळी बोलताना तटकरे म्हणाले की, आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्याला टिकायचे असेल तर त्या पध्दतीचे शिक्षण आपण मुलांना दिले पाहिजे. आपले संस्कार जेवढे चांगले तेवढी येणारी पीढि अधिक सक्षम आहे. आणि हेच कोकणी माणसाच्या बाबतीत दिसते. कोकणातील युवक आज सर्वच क्षेत्रात यश संपादन करीत आहे. आणि हे नक्कीच कौतुकास्पद आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात आलेले कोकणी बांधव आज कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात काम करत आहेत. काहीजण आपला उद्योग संभाळत आहे. तर कोण नोकरी करत आहेत. असे असतान त्यांच्यामध्ये असलेली एकी पाहून खरंच मनोमनी समाधान वाटते. त्याचप्रमाणे काहींनी येथील राजकारणात आपला ठसा उमठविला आहे. आणि ते आपल्या परिने कार्य करित आहे. पुर्वी कोकण खुपच मागसलेला होता मात्र आज त्याच्या झपाट्याने विकास होत आहे. अनेक उद्योगधंदे कोकणात येऊ लागले आहे. तेथील स्थानिक लोकांना देखिल रोजगार उपलब्ध होत आहे. परंतु कोकणी युवकांने आपला स्वतःचा काही उद्योग व्यवसाय सुरू केल्यास त्याच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. असे ते म्हणाले.

यावेळी जनजागृतीचा मेळा हा महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. तसेच महिलांसाठी हळदीकुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव संस्थेचे सेवाभावी कार्यकर्त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक अनंत कदम यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा. संदिप कदम व रेश्मा चव्हाण यांनी केले. मारूती यादव यांनी आभार मानले. मेळाव्यास कोकण अठरागांव रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.