Moshi : पादचारी महिलेची सोन्याची साखळी हिसकावली

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलेची दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी सोन्याची साखळी हिसकावून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 17) रात्री मोशी आळंदी रस्त्यावर घडली.

मनीषा निलेश खोकले (वय 30 रा. आळंदी रोड, मोशी) यांनी या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनीषा मंगळवारी रात्री पावणेआठच्या सुमारास मोशी आळंदी रस्त्यावरून पायी चालत जात होत्या. त्या माजी नगरसेवक धनंजय आल्हाट यांच्या बंगल्यासमोर आल्या असता दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून नेली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.