Alandi : आळंदी येथे दारूच्या हातभट्टी वरून दीड लाखाचे रसायन नष्ट; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – आळंदी (Alandi) येथील कांजारभाट वस्ती येथील दारु हातभट्टीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 4 हजार रुपयांचे दारु निर्मितीचे रसायन नष्ट करण्यात आले आहे. 

याप्रकरणी पोलीस शिपाई अशोक गारगोटे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून वंती नानावत (रा. कांजारभाट, आळंदी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kiwale : मराठी भाषा दिन उत्सहात साजरा

पोलिसांनी (Alandi) दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा एका जमिनीत खोदलेल्या खड्ड्यामध्ये ताडपत्री टाकून ड्रममध्ये 7 हजार लिटर असे 1 लाख 40 हजारांचे रसायन निर्मिती करत होता. पोलिसांनी कारवाई करत रसायन नष्ट केले. मात्र, आरोपी तेथून फरार झाला होता. आळंदी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.