Moshi Crime News : दुचाकीवरून गांजा विक्रीसाठी जाणा-यास अटक; सव्वापाच लाखांचा गांजा जप्त

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून गांजा विक्रीसाठी जात असलेल्या एका व्यक्तीला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पाच लाख 25 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 17) रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास नवीन 90 फुटी रोड, मोशी येथे करण्यात आली.

संजय सदाशिव मोहिते (वय 40, रा. शास्त्री चौक, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई नितीन खेसे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्याच्या दुचाकीवरून (एम एच 12 / एस एस 3523) गांजा विक्रीसाठी जात असल्याची माहिती एमआयडीसी भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नवीन 90 फुटी रोड, मोशी येथे सापळा लावून कारवाई केली. आरोपी त्याच्या दुचाकीवरून एका गोणीमधून गांजा विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी पाच लाख 25 हजारांचा गांजा जप्त करत आरोपीला अटक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.