Moshi Crime News : रिक्षा चालकाने प्रवाशाला जीवे मारण्याची धमकी देत लुटले

एमपीसी न्यूज – रिक्षातून जात असलेल्या एका प्रवासी तरुणाला रिक्षा चालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून जीवे मारण्याची धमकी देऊन लुटले. ही घटना रविवारी (दि. 14) दुपारी साडेचार वाजता इंद्रायणी नदीच्या पुलाखाली मोशी येथे घडली.

अंशू प्रताप सिंग योगेन्द्र सिंह (वय 26, रा. बर्गे वस्ती, चाकण) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रिक्षा चालक आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास तळवडे येथून मोशीकडे रिक्षाने जात होते. मोशी येथे इंद्रायणी नदीच्या पुलावर रिक्षा आली असता चालकाने लघुशंकेच्या बहाण्याने रिक्षा थांबवली. त्यानंतर फिर्यादी यांना रिक्षातून उतरवून पुलाच्या खाली नेले.

तिथे फिर्यादी यांच्याकडील सात हजारांचा मोबाईल फोन, 500 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली. तसेच आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी रिक्षातून मोशीकडे निघून गेले.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.